पंतप्रधान मोदींनी पहीली ५ वर्षे, “काँग्रेस काळातील प्रकल्पांची ऊदधाटने व लोकार्पण” करण्यातच घालवल्याचे स्मरण ठेवावे – गोपाळदादा तिवारी
पुणे : पंतप्रधान मोदींनी पहीली ५ वर्षे, “काँग्रेस काळातील प्रकल्पांची ऊदधाटने व लोकार्पण” करण्यातच घालवल्याचे स्मरण ठेवावे.. तसेच, अरबी समुद्रातील शिवस्मारक, इंदूमिल चे डॉ. आंबेडकर स्मारक, पुणेशहरासह १०० स्मार्टसिटी, बुलेटट्रेन इ आपल्या शुभहस्ते झालेल्या ‘भूमिपूजन प्रकल्पांची’ लोकार्पणे कधी होणार याचा ही परामर्श घ्यावा असे आवाहन काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिध्दी निवेदनात केले.
काँग्रेसयुपीए काळातील मान्यता प्राप्त ‘पुणे_मेट्रो ही नागपूर अगोदर मंजूर होऊन देखील, राजकीय कुरघोडीने ३ वर्ष विलंबाने आज मार्गी लागली…मेट्रो व इतर प्रकल्पांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान मा नरेंद्र मोदी आज जाहीर सभेत बोलतांना पुर्वी भूमिपूजने व्हावयाची परंतू ऊदधाटने व लोकार्पण लवकर होत नसल्याची खंत जाहीरपणे व्यक्त केली.. यावर आक्षेप नोंदवताना काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी “काँग्रेस च्या सत्तेच्या काळातच” देश विकासाच्या मार्गावर असल्यामुळेच, “आर्थिक महासत्ता व २१ व्या शतकातील डीजीटल इंडीया” च्या रूपाने ऊभा असून, ‘आधार कार्ड ते एटीएम सेवा’ देखील देशात मोदी सरकार येण्यापुर्वीच् स्थानापन्न झाल्याची नोंद देखील मा पंतप्रधानांच्या ठायी असावी, असे प्रतिपादन देखील त्यांनी केले.
किंबहुना काँग्रेस काळातील केंद्र सरकारचे मेट्रोचे अनुदान कमी करत ते पुन्हा २० % वरून १०% वर आणले.. तसेच स्वराज्यातील “अहमदाबाद मेट्रो चा काय विस्तार झाला”(?) याचे देखील मोदी – शहांनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देखील गोपाळदादा तिवारी यांनी दिला…!
तसेच, पुणे शहरातील स्वातंत्र्य सेनानींचा ऊल्लेख करतांना त्यांनी अगोदर माहीती घ्यावयास हवी होती… अन्यथा मा वि दा सावरकर यांना त्यांनी ‘पुण्याचे’ व महात्मा गांधींचे गुरू डॅा गोपाळकृष्ण गोखले यांना गोपाळकृष्ण देशमुख संबोधले नसते… अशी टिका देखील गोपाळदादा तिवारी यांनी केली…!
