प्रत्येक राज्याला राज्यपाल असतो, महाराष्ट्रात मात्र ‘भाजपाल’ – नाना पटोले
मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक चुकीचे विधान केले होते. तसेच काल विधीमंडळ अर्थसंकल्पाच्या सुरवातीला भाषण अर्धवट सोडून राज्यपाल निघून गेले. महाराष्ट्राच्या इतिहासात हे प्रथमच घडले. या पार्श्वभूमीवर आज कॉंग्रेस प्रदेशाध्य आमदार नाना पटोले यांनी एक खोचक ट्वीट करीत राज्यपालांवर टीका केली आहे. नाना पटोले यांनी म्हटंले आहे की, ‘प्रत्येक राज्याला राज्यपाल असतो, महाराष्ट्रात मात्र ‘भाजपाल” आहे.
हर राज्य में राज्यपाल होता है, महाराष्ट्र में 'भाजपाल' है|
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 4, 2022
राज्यपालांना परत पाठवण्या संदर्भात ठराव आणू
काल नाना पटोले म्हणाले होते की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई यांचा अवमान केला आहे. या अपमानाबद्दल राज्यपालांना महाराष्ट्राची माफी मागावीच लागेल. तसेच राज्यपाल कोश्यारी यांना परत पाठवण्यासंदर्भात विधिमंडळात ठराव आणण्यासाठी आम्ही कायदेशीर बाबींचा विचार करत आहोत.
