fbpx
Thursday, April 25, 2024
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

भीमसेन जोशी यांनी जगाला आवाज दाखवला – जावेद अख्तर

२० व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे भव्य सोहळ्यात उदघाटन

पुणे: ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी जगाला आवाज दाखवला,’ अशा शब्दांमध्ये गीतकार, पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी भीमसेन जोशी यांना आदरांजली अर्पण केली. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २० व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (पिफ २०२२) आज पटकथाकार जावेद अख्तर आणि शास्त्रीय गायक पंडित सत्यशील देशपांडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी अख्तर बोलत होते.

 

‘पिफ’चे संचालक ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, पुणे फिल्म फाउंडेशनचे सरचिटणीस रवी गुप्ता, विश्वस्त सतीश आळेकर, चित्रपट निवड समितीचे सदस्य समर नखाते, अभिजित रणदिवे यावेळी उपस्थित होते.
भारतरत्न लता मंगेशकर यांना चित्रफितीमधून श्रद्धांजली वाहण्यात आली. पंडित बिरजू महाराज यांना अभिनेत्री शर्वरी जमेनीस हिने नृत्यांतून आदरांजली अर्पण केली. यशवंत जाधव यांनी पोवाडा आणि डॉ. गणेश चंदनशिवे यांनी पारंपरिक गोंधळ सादर केला. अभिनेत्री श्रेया बुगडे आणि अभिनेता स्वप्निल जोशी यांनी सोहळ्याचे निवेदन केले.

उद्घाटन सोहळ्यानंतर स्वित्झर्लंडच्या मानो खलील यांच्या ‘नेबर्स’ हा चित्रपट दाखवण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading