सलग चौथ्यांदा स्थायि समितीच्या अध्यक्षपदी हेमंत रासने

पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. १० विरूद्ध ६ असा रासने यांनी राष्ट्रवादीचे उमदेवार प्रदीप गायकवाड यांच्यावर विजय मिळवला. रासने यांची सलग चौथ्यांदा अध्यक्षपदावर निवड झाली आहे. स्थायी समिती अध्यक्षपदाची मुदत 28 मार्च रोजी संपत आहे. तर महापालिकेची मुदत 14 मार्च रोजी संपणार आहे. त्यासाठी 14 मार्च ते 28 मार्च या १४ दिवसांसाठी नवे स्थायी समिती अध्यक्ष निवडले गेले आहेत.

१ मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरण्यात आला. त्यानंतर आज सकाळी महापालिकेत निवडणूक झाली. पीएमपीचे व्यवस्थापक संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते. स्थायी समितीमध्ये भाजपचे १०, राष्ट्रवादीचे चार, शिवसेना व काँग्रेसचे प्रत्येकी एक असे एकूण १६ सदस्य आहेत. त्यामुळे रासने यांची निवड ही औपचारिकता होती. तरीही भाजपने दगाफटका होऊ नये यासाठी व्हीप काढला होता. रासने यांचा विजय निश्चित असल्याने शक्तिप्रदर्शन करण्यासाठी कार्यकर्ते जमा झाले होते. महापालिकेच्या बाहेर ढोलताशे वाजवून, घोषणाबाजी करून रासने यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळतोच  

“पक्षाच्या नेत्यानी मला सलग चौथ्यांदा स्थायि समितीच्या अध्यक्षपदी होण्याची संधी दिली. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जसा न्याय मिळतो त्याचे उदाहरण आहे. प्रकाश जावडेकर ,गिरीश बापट यांचे हार्दिक आभार मानतो.”

-हेमंत रासने (स्थायि समिती अध्यक्ष) 

Leave a Reply

%d bloggers like this: