प्रवासातील अनुभवाने तुमच्यातील आत्मविश्वास आणि सहनशीलता वाढते – डॉ. राधा मंगेशकर

पुणे: जेव्हा मी एकटीने फिरायला सुरवात केली, तेव्हा मला ते आवडू लागले. त्यामुळे माझी निर्णय घेण्याची क्षमता वाढली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, माझ्यातले भय पूर्णपणे नष्ट झाले, आत्मविश्वास वाढला. हे कळले कि, प्रवासातील अनुभवाने तुमच्यातील सहनशीलता आणि आत्मविश्वास वाढतो, असे मत युवा गायिका डॉ. राधा मंगेशकर यांनी व्यक्त केले.

पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचच्या वतीने डॉ.राधा मंगेशकर यांच्या ‘एकटीचा सफरनामा’ या पुस्तकाविषयी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार, साधना सरपोतदार, शर्मिला सरपोतदार, अभय सरपोतदार समन्वयक अजित कुमठेकर यांनी केले. यावेळी मसापचे प्रकाश पायगुडे, आनंद सराफ , इस्कॉनचे संजय भोसले, पं. वसंतराव गाडगीळ, गेट सेट गो चे अमित कुलकर्णी, मँगो हॉलिडे चे मिलिंद बाबर, चैतन्य पराठाच्या संचालिका समीरा जांगिरा, सतीश पाकणीकर, नारगोळकर काका, सुलभा तेरणीकर, धनंजय दातार, अविनाश निमसे , अमृत पुरंदरे आदी मान्यवर उपस्थित होते. रुपाली पाथरे यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ राधा मंगेशकर म्हणाल्या, एकटीने फिरताना सर्वप्रथम याची जाणीव झाली, तुम्ही एकटे फिरता म्हणजे तुम्हाला एकटेपणा जाणवतोय असे नाही. जेव्हा तुम्ही एखादे सुंदर ठिकाण, वास्तु किंवा तेथील कलाकृती पाहता तेव्हा तुमचे स्वतःचे ओरिजनल विचार तुम्हाला कळतात. त्या भावनांमध्ये कोणाचेही विचार लादलेले नसतात. त्यामुळे तुम्ही अधिक स्वतंत्र विचार करु लागता.

पुढे त्या म्हणाल्या, खजुराहो लेण्या म्हणजे केवळ कामशिल्पे अशी उभी केलेली प्रतिमा हे अत्यंत दुर्दैवी आहे. तेथे केवळ १० टक्के शिल्प ही कामशिल्प असून उर्वरित सर्व शिल्प धर्म, अर्थ आणि ज्ञानाने भरलेली आहेत असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: