Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक

मुंबई: अंडरवर्ल्डशी संबंध व मनी लॉंड्रिग प्रकरणी राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून तब्बल आठ तासांच्या चौकशी नंतर अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी न्यायालयात सेशन कोर्टात सुनावणी सुरू आहे.

आज सकाळीच पाचच्या दरम्यान ईडईने कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या मुंबईतील घरावर छापा टाकला. त्यानंतर साडे सात वाजता मलिक यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले होते. विशेष म्हणजे कोणताही समन्स न बाजावता व पूर्व कल्पना न देता ही चौकशी करण्यात आली आहे.
नेमके प्रकरण काय आहे ?

दाऊदची बहीण हसिना पारकर ही त्याची भारतातील हस्तक असून तिच्या माध्यमातून दाऊद भारतातील व्यवहार करतोय. तिच्या माध्यमातून अनेक ठिकाणी संपत्ती गोळा केली गेली आहे. हसिना पारकर आणि नवाब मलिक यांचा आर्थिक संबंध आहे. त्यामुळे नवाब मलिकांचा संबंध थेट अंडरवर्ल्डशी आहे. त्यामुळे अंडरवर्ल्डशी संबंधित संपत्ती नवाब मलिकांनी खरेदी केली असल्याचा आरोप ईडीने केला आहे. यात 20 वर्षांपूर्वी हसिना पारकरचा ड्रायव्हर सलीम पटेल याच्याकडून मलिक कुटुंबियांनी जमीन खरेदी केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading