नवाब मलिकांवर ईडीने केलेल्या कारवाई विरोधात राष्ट्रवादीचे पुण्यात निषेध आंदोलन
पुणे : आज ‘ईडी’ने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर कारवाई केली. त्यानंतर त्यांना अटकाही कारण्यात आली. ईडीने केलेल्या या कारवाई विरोधात आज पुण्यात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीने बालगंधर्व चौकात निषेध आंदोलन केले.
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर प्रवक्ते प्रदीप देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर महिला अध्यक्ष मृणाल वाणी, विरोधी पक्षनेता दिपाली धुमाळ, राष्ट्रवादीचे नेत्या रूपाली पाटील ठोंबरे, माजी महापौर व स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सीमा सातपुते व पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशांत जगताप म्हणाले, गेल्या एक वर्षापासून ईडीने महाविकास आघाडी सरकारमधला मंत्र्यांवर कारवाई करत आहे. या भाजप सरकारला वाटते की महाविकास आघाडी सरकार मधल्या मंत्र्यांवर जर आपण ईडी मार्फत कारवाई करत आहे. आमचे राष्ट्रवादीचे सर्वात लाडके नेते यांची काही चूक नसताना त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. अशा कारवायांना राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी घाबरणार नाही. आम्ही येणाऱ्या पुढील काळात भाजपला जाब विचारणार आहोत. ईडीने कारवाई केल्याच्या विरोधात आज आम्ही आंदोलन करत आहोत असे प्रशांत जगताप म्हणाले.
रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, या भाजप सरकारने शिवरायांचा पण अपमान केला आहे. मुस्लिम महिलांना बुरखा घालायला पण या भाजप सरकारने बंदी घातली आहे. आमच्या महा विकास आघाडीच्या सरकारमध्यल्या मंत्र्यांवर भाजप ईडीची कारवाई करून महाविकास आघाडी सरकार पडेल असे त्यांना वाटत आहे. त्यांनी हा गैरसमज डोक्यातून काढावा. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्या बद्दल बोलताना जरा नीट बोलावे. ईडी ने कारवाई केल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत असे रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.
