महाविकास आघाडीमध्ये बिघाडी : पुणे जिल्ह्यात शिवसेनेच पाडलं राष्ट्रवादीला खिंडार
पुणे : एकीकडे महाविकास आघाडीत सार आलबेल आहे, असे सत्तेतील तिन्ही नेते सांगत असले तरी; महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची पळवा पळवी सुरूच आहे. आज पुणे जिल्ह्यात शिवसेनेने भाजप, राष्ट्रवादीला खिंडार पाडलं आहे. राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर यांच्यासह राष्ट्रवादी गणेश मांडेकर – उपसरपंच, राष्ट्रवादी संदीप खानेकर – सदस्य, राष्ट्रवादी सुखदेव मांडेकर – सरपंच, राष्ट्रवादी गणेश मांडेकर – उपसरपंच, राष्ट्रवादी संदीप खानेकर – सदस्य, राष्ट्रवादी आणि भाजपचे अमोल शिंदे – सरपंच वातुंडे सुखदेव मांडेकर – सरपंच या सगळ्यांणी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
आज येरवडा येथील डॉ.चिमा उद्यान मध्ये उभारण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी उपसभापती नीलम गोऱ्हे, शिवसेना नेते सचिन अहिर, शिवसेना नेते आदित्य शिरोडकर, पुणे महानगरपालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार, आयोजक नगरसेवक संजय भोसले तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
