Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

इंटरनॅशनल आर्ट एक्स्पो पुणेचे आयोजन 

पुणे : शहरातील  प्रथितयश व आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकार व शिल्पकारांनी एकत्र येत आज इंटरनॅशनल आर्ट एक्स्पो पुणेच्या आयोजनाची घोषणा केली.  हे प्रदर्शन 12 ते 15 मे 2022 दरम्यान पुणे येथे होणार आहे. या  इंटरनॅशनल आर्ट एक्स्पो मध्ये पुणे, महाराष्ट्रासह जगभरातून चित्रकार व शिल्पकार सहभागी होणार आहेत अशी माहिती आयोजक अतुल काटकर व प्रमोद माने यांनी दिली .

या प्रसंगी ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी , चारुहास पंडित , उमाकांत कानडे, बाप्पू झांजे, शंकर गोजारे यांनी आपली मते मांडली , ह्या कार्यक्रमाला सुरेन्द्र करमचंदानी, चेतन मोरे, नितीन पवार, सचिन तर्कसे आदी उपस्थित होते. या  इंटरनॅशनल आर्ट एक्स्पो मध्ये चित्रकला , रेखाटने , शिल्पकला व इतर सर्व कला माध्यम सादर करता येणार आहेत.  कार्यक्रमाचे आयोजन आर्टक्यूब गँलेरिया पुणे यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading