Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

भारताच्या संविधानात शिवमुद्रेचे प्रतिबिंब – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे : भारताच्या संविधानात शिवमुद्रेचाच् मतिथार्त दडलेला असून, शहाजीराजांनी शिव छत्रपतींना दिलेल्या शिक्का वजा मुद्रेवर संस्कृतमध्ये (मुद्रा भद्राय राज्यते) “सत्ता ही प्रजेच्या हितासाठी, कल्याणासाठी व भल्यासाठी” असल्याचा ऊल्लेख होता. स्वतंत्र भारताचे संविधान लिहीतांना डॅा आंबेडकर व प्रभुतींनी भारताची ऐतिहासीक पार्श्वभूमि, पुर्वीच्या राजांची धोरणे, भारता विषयी’चा व्यापक लढा, देशाप्रति त्याग – बलीदानाचे योगदान लक्षात घेऊन, शेवटचा ‘भारतिय नागरीक’ केंद्रबिंदू मानून संविधान बनवले. त्यात ‘शिवमुद्रेवरील बोध वाक्याचा मतिथार्त’ देखील दडला असल्याचे स्पष्ट होते. मात्र याची अपेक्षीत अंमलबजावणी सत्ताधाऱ्यांकडून किती होते(?) हा सत्तेवरील पक्षांना आत्मचिंतन करायला लावणारा प्रश्न आहे, असे मत काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी व्यक्त केले.

आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात आम्ही जन्मलो ही अभिमानास्पद बाब आहे. म्हणूनच शिव छत्रपतींचे संस्कार व शिकवण यांची जोपासना करणे व महाराष्ट्र धर्म वाढवणे, हे प्रत्येक महाराष्ट्रवासीयांचे कर्तव्य ठरते.

पुणे जिल्हा मेडीसीन डीलीव्हरी बॅाईज संधटना व सदाशिव पेठ फार्मा मार्केट तर्फे आयोजित श्री शिवाजी महाराज जयंती प्रित्यर्थ अभिवादन करतांना ते बोलत होते.

महाराष्ट्र हा कोणाचा नसून, शिव छत्रपतींचा आहे. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी सहन केली जाणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या प्रसंगी सांगीतले.

या प्रसंगी पुणे शहर पोलीस सहाय्यक आयुक्त सतिश गोवेकर, सर्वश्री युवराज निंबाळकर, डॅा शैलेश गुजर, पप्पुशेठ गुजर, आकाश जाधव, दिपक पोकळे, पायगुडे बंधू, योगेश भोकरे, अर्रूण गवळे, महेश अंबिके, पै शंकर शिर्के आदी उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक निमंत्रक व काँग्रेस व्यापारीसेल चे उपाध्यक्ष प्रसन्न पाटील यांनी केले सुत्र संचालन पप्पुशेठ गुजर यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading