‘जय भवानी’ ही घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली – प्रकाश आंबेडकर
मुंबई : आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देशात सर्वत्र उत्साहात साजरी होता आहे. या दिवसाचे औचित्य साधून प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करीत एका ऐतिहासिक तथ्याचा उलगडा केला आहे. आंबेडकरी चळवळ व शिवाजी महाराज हे नाते जुने आहे. ‘जय भवानी’ ही घोषणा सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली होती; ही माहिती प्रकाश आंबेडकर यांनी पुरावे देऊन मांडली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हंटले आहे की, “शिवजयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा. शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने काही ऐतिहासिक तथ्यांचा उलगडा होणे गरजेचे आहे. आंबेडकरी चळवळ व शिवाजी महाराज हे नाते जुने आहे. परळच्या दामोदर हॉल येथे बाबासाहेबांना भेटायला येणारे लोकं हे एकमेकांना ‘जय भवानी’ असं अभिवादन करत असत. त्याकाळी बाबासाहेबांच्या अधिकृत लेटर हेडवर भवानीचं चित्र असे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रहाच्यावेळी शिवाजी महाराज,महात्मा फुले व गांधीजींच्या प्रतिमा ठेवल्या होत्या. तसेच महाड सत्याग्रहाच्या वेळी दासगाव ते महाडपर्यंत निघालेल्या जमावाने शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांचा जयजयकार करायला सुरुवात केली होती. ठेकेदारांनो जरा वाचायला शिका!”, अश्या शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी विरोधकांना सुनावले आहे.
आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक सदिच्छा. या निमित्ताने काही ऐतिहासिक तथ्यांचा उलगडा होणे गरजेचे आहे. आंबेडकरी चळवळ व शिवाजी महाराज हे नाते जुने आहे.
"जय भवानी" ही घोषणा सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली.
१/३ pic.twitter.com/xw3mugLF1s
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) February 19, 2022
