शिवसंग्राम संघटनेतर्फे शिवजयंती उत्सव साजरा
पुणे : दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी शिवसंग्राम संघटनेतर्फे शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८८९ साली जगातील पहिली शिवजयंतीची मिरवणूक ज्या ठिकाणाहून काढली होती त्या “हिराबाग” येथून ही मिरवणूक निघाली. परंतु कोरोनाच्या महासंकटामुळे यावर्षी “हिराबाग” येथे एकच ठिकाणी हा महोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे पोलिस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक अजय खेडेकर, सम्राट थोरात तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पणतूस्नुषा नीता होले आदी उपस्थित होते.
रवींद्र शिसवे यांनी “शिवरायांचे आपल्या जीवनातील स्थान” या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. जो आपला इतिहास विसरून वर्तमानात वावरतो तो आपले भविष्य कधीही घडवू शकत नाही हे सांगताना शिवचरित्रा पासून आपल्याला किती तरी शिकता येते. हे त्यांनी अनेक कविता दाखले देऊन विषद केले.
हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी अभिजित म्हासवडे, किशोर मुळुक, मनोज शिंदे, महेश पवार, संजय ढोले, सूर्याजी काकडे, राजेंद्र मेमाणे, शिवराज मोटे आदींनी विशेष प्रयत्न केले.
