Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

मी आणि नीलम ताई जरी आज एका कार्यक्रमात एकत्र आलो तरी; आम्ही एका पक्षात नाही – चंद्रकांत पाटील

पुणे : सध्या राज्यात फोडाफोडीचे राजकारण चालले आहे.  मी आणि नीलम ताई जरी आज एका कार्यक्रमात एकत्र आलो तरी आम्ही काही एका पक्षात आलेलो नाही, असे भाजपचे प्रवक्ते चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

आज शिवजयंती निमित्त माझ्याकडून व भारतीय जनता पार्टी कडून सगळ्यांना शुभेच्छा.
मी आणि शिवसेनेच्या नेत्या व विधानसभेचे उपसभापती नीलम ताई गोऱ्हे, महापौर व उपमहापौर
एकत्र येऊन शिवजयंती आम्ही करत आहोत.

राज्यात सध्या जे काही होत आहे त्यामुळे महा विकास आघाडी सरकारमधल्या व विरोधी पक्षांमधल्या मंत्र्यांमध्ये वाद होत आहेत त्यावर मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे. व हे सगळे थांबवावे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading