fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

कोंढव्यातील शिवजयंतीला घडले हिंदू -मुस्लिम एकतेचे दर्शन

मुस्लिम मावळा हाजी गफुर पठाण यांनी केली प्रचंड उत्सवात शिवजयंती 

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान म्हणजे शिवनेरी जुन्नर. येथील महाराजांचे मावळे  सरदार मधील वंशज हाजी गफुर पठाण यांनी कोंढवा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मुस्लिम समजाच्या समवेत अतिशय उत्साही आणि दिमाखदार पद्धतीने साजरी केली.

हाजी गफुर पठाण हे स्वतः मुस्लिम मावळाचे वंशज आहेत. सर्व धर्म समभाव हा महाराजांनी आम्हाला सर्वांना एक आदर्श दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

हडपसर मतदार संघाचे आमदार चेतन तुपे कोंढवा येथील आगळ्या वेगळ्या जयंती उत्सवाला हजर राहिले. त्यांनी हाजी गफुर पठाण मुस्लिम मावळा यांचे आणि या जयंती उत्सवाचे मनापासून कौतुक केले. हीच खरी छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरंजली असल्याचे सांगितले.

कोंढवा खुर्द मिठानगरमध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने जाणता राजा, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दि मुस्लिम फाउंडेशन, समस्त ग्रामस्थ व समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने तसेच स्थानिक नगरसेवक हाजी गफुरभाई पठाण यांच्या माध्यमातुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश कोंढवा भागातील मुस्लिम समाजाच्या वतीने दर्शविण्यात आला. परिसरातील अनेक हिदु-मुस्लिम बंधु भगिनींनी यामध्ये सहभागी होऊन शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा केला.

यावेळी हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक गफुर पठाण, नगरसेविका नंदा लोणकर, नारायण लोणकर, अल्पसंख्याक अध्यक्ष समीर शेख, संजय लोणकर, राहुल लोणकर, बाप्पु मुलाणी, इम्तियाज शेख, मोहम्मदीन खान, सिकंदर पठाण, शकुर सय्यद, समीर पंजाबी, तनवीर शेख, हाफिज शेख, आस्मा खान,राजु आडागळे,छबिल पटेल,हुसेन पाशापुरी आदि मान्यवर व नागरिक उपस्थित होते. यावेळी नगरसेवक गफुर पठाण यांनी आभार मानले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading