Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

शिवजयंती मिरवणुकीला परवानगी द्यावी : महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यास सलग दोन वर्षे बंधने आल्याने यंदाचा शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा व्हावा, असा सूर शिवप्रेमींकडून निघत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकीला परवानगी द्यावी, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी शिवजयंती साजरी करण्याच्या नियोजनाची बैठक घेतली. या बैठकीस पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांच्यासह शिवजयंती उत्सव समितीचे, प्रतिनिधी, महापालिका अधिकारी यांची उपस्थिती होती.

याबाबत माहिती देताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशा पद्धतीने साजरी केली जावी? यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या काळातील निर्बंधांमुळे शिवजयंतीचा उत्सव साजरा करताना मर्यादा आल्या, अशा भावना शिवप्रेमींनी व्यक्त केल्या होत्या. शिवजयंती उत्सवासाठी आवश्यक अटी आणि शर्थी घालून देऊन राज्य सरकारने मिरवणुकीला परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. राज्यशासनाच्या नियमावलीत मिरवणुकीच्या परवानगीचाही समावेश असावा, अशी भूमिका आहे’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading