Sunday, June 14, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे शहराचे पोलीस आयुक्त हे ठाकरे-पवार सरकारचे एजंट आहेत – किरीट सोमय्या

पुणे : माझ्यावर ज्या शिवसैनिकांनी जीवघेणा हल्ला केला त्या शिवसैनिकांवर शेजारी उभे असणाऱ्या पुणे पोलिसांनी किरकोळ गुन्हे दाखल केले आहेत. खरं तर या हल्लेखोरांवर हत्येचा गुन्हा दाखल करायला हवा होता. मात्र पुणे पोलिसांनी असे न करता त्यांच्यावर किरकोळ गुन्हे दाखल केले आहेत.  त्यामुळे पुणे शहराचे पोलीस आयुक्त हे ठाकरे- पवार सरकारचे एजंट आहेत, अशी टीका पुण्यातील पत्रकार परिषदेत भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर केली.

या पत्रकार परिषदेला भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक,खासदार गिरीश बापट व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

किरीट सोमय्या म्हणाले ,पीएमसी बँकेचे सहा हजार 400 कोटी रुपये लाटणाऱ्या राकेश वाधवान यांना ते वॉन्टेड असताना पळवलं होतं. शनिवारी मी जेव्हा महापालिका आयुक्तांना भेटण्यासाठी आलो होतो. तेव्हा या ठिकाणी पुणे पोलिसांचा एकही कर्मचारी नव्हता. तेव्हा सर्व पोलीस अमिताभ गुप्ता यांनी गायब केले होते.

पुण्यातील कोविड सेंटरचा ठेका मिळालेल्या कंपनीचा मालक चहावाला आहे. तसेच हा चहावाला केईएम रुग्णालयामागे असतो. ठाकरे सरकारने पुण्याच्या लोकांच्या जीवाशी खेळ केला. संजय राऊत यांची ही बेनामी कंपनी आहे, असा आरोप ठाकरे सरकार वर किरीट सोमय्यांनी केला.

गिरीश बापट म्हणाले, चहाचा तर घोट घ्यायचा आहे, पण अनेकांच्या गळ्याचा देखील घोट घ्यायचा आहे. किरीट सोमय्या अनेकांची वाट लावण्याचं काम करत आहे. गेली अनेक वर्ष किरीट सोमय्या आणि मी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुका, आंदोलनं, कार्यक्रमाला जातो. त्यावेळी ज्या पद्धतीने त्यांची तलवार चालते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading