Friday, June 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

दिलासादायक : पुणे शहरातील कोरोना रुग्णसंख्या सलग दुसऱ्या दिवशी हजाराच्या खाली

आज दिवसभरात पुणे शहरात 700 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

पुणे : पुणे शहरातील कोरोना रुग्णसंख्या आज सलग दुसऱ्या दिवशी एक हजारा पेक्षा कमी नोंदवली गेली आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 700 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2197 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 6 लाख 55 हजार 996 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 6 लाख 39 हजार 981 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील तर 4पुणे महापालिका हद्दीबाहेरील2रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9326जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या 7489 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 204 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 6488 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली  आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading