लोकायत नागरी समितीच्या प्रयत्नातून असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या ४२ कुटुंबीयांना मिळणार हक्काच रेशन
पुणे : पुण्यातील विविध वस्त्यांमध्ये लोकांना हक्काच रेशन मिळवून देण्यासाठी लोकायत नागरी समितीचा सतत प्रयत्न असतो. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून गेले १५ दिवसात मोमीनपुरा व गंजपेठे मधील रेशन मिळवून देण्याबाबत नागरी समितीच्या कार्यकत्यांनी सर्वेक्षण केले. त्यापैकी गरजूंना 42 कुटुंबीयांना रेशन मिळवण्याबाबत हमी पत्राच्या अर्जाचे निवेदन मंडई रेशन ‘ग’ परिमंडळ कार्यालयाचे अधिकारी लक्ष्मण माने आणि निरीक्षक वशिष्ठ पांचाळ यांना देण्यात आले.
घरकाम, भाजीपाला विकणारे, पथारी, सुतारकाम, पेंटिंग असे विविध असंघटित क्षेत्रात काम करणारे हे नागरिक आहेत. त्यांना येत्या ४५ दिवसात रेशन सुरू होईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
तसेच लोकायत नागरी समितीचे कार्यकर्ते ॲड. मोनाली अर्पणा यांनी स्थानिकाना रेशन मिळण्याबाबतच्या अडचणी ही अधिकाऱ्यांना सांगितल्या.
यावेळी शिष्टमंडळात योगेश मंजुळा, इश्टीयाक शेख, मानव नेटके, प्रतिक कांबळे, इलीयाज शरीफ, मंगल निकम उपस्थित होते.
