Friday, July 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पंधरा दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, शिंदे, ठाकरे एकत्र येण्याची ही शक्यता

 

मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय रवी राणा यांचे भाकीत

अमरावती प्रतिनिधी

पुढील पंधरा दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवार गट हे दोन्ही एकत्र येणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असलेले आमदार रवी राणा यांनी केला आहे. त्याचप्रमाणे भविष्यात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट हे देखील एकत्र येण्याचे भाकीत त्यांनी वर्तवले आहे.

जे जे अशक्य कोटीतील वाटते तेथे राजकारणात शक्य झाल्याचे आतपर्यंत दिसून आले आहे. पुढील पंधरा दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील. त्या पक्षाचा दिल्लीतील कारभार बघतील आणि सुनेत्रा पवार यांच्यावर पक्षाची राज्यातील जबाबदारी असेल, असा दावा राणा यांनी केला आहे.

कालमर्यादा निश्चित सांगता येत नसली तरी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही भविष्यात एकत्र येऊ शकतात, असा दावाही राणा यांनी केला आहे. राणा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमाणेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही निकटवर्तीय असल्याने त्यांच्या दाव्यांनी राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading