fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावरून पुण्यात भाजप व काँग्रेस कार्यकर्ते आमने- सामने  

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा लोकसभेत काँग्रेस पक्षाने कोरोना पसरविला, असा आरोप काँग्रेसवर केला. त्याच्या निषेधार्थ आज कॉंग्रेसने आंदोलन केले. पण त्याच वेळी भाजपचे कार्यकर्तेही तेथे आले. अन् घोषणाबाजी करायला सुरूवात केली. त्यामुळे शहरातील राजकीय तापमान चांगलेच तापले आहे.

एकीकडे काँग्रेसचे नेते ‘कोरोना हा आम्ही नाही पसरवला मोदी सरकारने पसरवला आहे’, असा आरोप करत होते. तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते याला विरोध करत होते. यावेळी बोलताना काँग्रेसचे रमेश बागवे म्हणाले, या केंद्र सरकारने गेल्या दोन-तीन वर्षात पेट्रोल डिझेलचे दर वाढवले आहेत. त्याचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. कोरोना आम्ही पसरवला, असा ते आमच्यावर खोटे आरोप करीत आहेत. मोदी सरकार कोरोना हाताळण्यात अपयशी ठरले आहे. याचा त्यांना फटका महानगरपालिका निवडणुकीत नक्कीच बसेल, असे रमेश बागवे म्हणाले.

तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते प्रतीक देसरडा म्हणले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते चुकीचे वक्तव्य केलेले नाही. सामान्य जनतेला चांगलेच माहित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात किती चांगले काम केले. काँग्रेसने आमच्यावर जे आरोप केले ते चुकीचे आहेत त्याचा आम्ही निषेध करत आहोत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading