मुस्लिम मुलींना हिजाब वापरण्यास बंदी : कर्नाटक सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध
पुणे : कर्नाटकमध्ये 2 दिवसापूर्वी मुस्लिम समुदायाच्या मुलींना हिजाब वापरण्यास कर्नाटक सरकारने बंदी घातली आहे. त्याचे पडसाद आज पुण्यातही उमटले. आज कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन करून निषेध करण्यात आला. हे आंदोलन पुण्यात महात्मा फुले वाडा गंजपेठ, येथे करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम मुली व महिला उपस्थित होत्या. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर प्रवक्ते प्रदीप देशमुख, रुपाली पाटील ठोंबरे, प्राजक्ता जाधव, सविता मारणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर अध्यक्ष महिला अध्यक्षा मृणाल वाणी, नगरसेवक वनराज आंदेकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती पुणे शहराअध्यक्ष सीमा सातपुते, रोहन पायगुडे,अशोक खांदवे, महेश हांडे, किशोर कांबळे, गणेश नलावडे, अजिंक्य पालकर, मनोज पाचपुते पुणे महानगर पालिकेतील नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रशांत जगताप म्हणाले, कर्नाटकमध्ये 2 दिवसापूर्वी मुस्लिम समुदायाच्या मुलींना हिजाब वापरण्यास कर्नाटक सरकारने बंदी घातली. हे एकदम चुकीचे आहे. कर्नाटक मधल्या भाजप सरकारने मुस्लिम धर्माचा आणि त्या समाजातिल मुलींचा आदर हा ठेवला पाहिजे. मुस्लिम समुदायाच्या मुलींना हिजाब वापरण्यास बंदी घातली. तर तेथील काही तरुण हसत होते. ही घटना निषेधार्थ आहे. याची जाणीव कर्नाटक सरकारला व्हावी म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहोत. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत याचा फटका भाजपला चांगलाच बसणार आहे, असा इशारा ही प्रशांत जगताप यांनी यावेळी दिला.
