Saturday, July 18, 2026
Latest NewsPUNE

युवकांचे महात्मा गांधी काल,आज आणि उद्या या विषयावर चर्चासत्र संपन्न

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जनता दल सेक्युलर पुणे शहर च्या वतीने युवकांचे महात्मा गांधी काल,आज आणि उद्या या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
या चर्चासत्रात ज्ञानदा वासनकर, हनुमंत पवार, कावेरी पाटील, वैभव कदम या युवकांनी आपले विचार मांडले.
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, हे या चर्चा सत्राच्या अध्यक्षस्थानी होते.व जनता दल सेक्युलर चे पुणे शहराध्यक्ष विठ्ठल सातव, सरचिटणीस दत्ता पाकीरे उपस्थित होते.
व्यासपीठावरून विचार मांडलेल्या युवकांना गांधी समजले आहेत आता केवळ गांधींना आचरणात आणण्याची वेळ आहे आणि त्यासाठी युवकांनी प्रयत्नशील राहावे ,असे लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले.या प्रसंगी जनता दल(से) उपाध्यक्षअंबादास कांबळे, कन्टोंन्मेंट विधानसभा जनतादल (से) अध्यक्ष जान्सन कोल्हापुरे ,संजय चव्हाण, खडकवासला मतदारसंघातील मा.विनायक राव ,मा.प्रशांत दांडेकर,मा.संदेश दिवेकर मा.प्रविण सप्तर्षी,जनतादलाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच छात्रभारतीचे तुकाराम डोईफोडे व राष्ट्र सेवा दलाच्या राज्य सहसचिव साधना शिंदे व अक्षय सुनके कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस दत्ता पाकिरे यांनी केले. व शहराध्यक्ष या. विठ्ठल सातव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading