Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

आमदार निलंबन प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं आम्ही स्वीकार करतो – विश्वजीत कदम

पुणे : आघाडी सरकारने घेतलेला बारा आमदारांच्या निलंबनाचा निर्णय घटनाबाह्य असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने व्यक्त केले आहे. त्यावर विविध नेत्याच्या प्रतिकिया आल्या आहेत.
12 आमदार निलंबन प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं आम्ही स्वीकार करतो, असं मत काँग्रेसचे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता व्यक्त केले.

सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये शेल्फ इन शॉप या पद्धतीने वाईनची विक्री ही संकल्पना राबविण्याचा सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विरोधी पक्ष सरकारवर टीका करत. त्यावर विश्वजीत कदम म्हणाले, सांगली आणि नाशिकमध्ये साखरेच्या
कंपन्या आहेत. त्यातून वाईन निर्मित होते. सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये वाईन निर्मितीचा निर्णय सरकारने घेतला आहे. विरोधी पक्षा सतत टीका करत आहेत. त्याऐवजी केंद्र सरकारने राज्य सरकारला जीएसटीचे तीस हजार कोटी द्यावेत. मग विरोधी पक्षांनी सरकारवर टीका करावी, असे विश्वजीत कदम म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading