कॉफी टेबल बुक छापणे म्हणजे नागरिकांच्या पैश्यांची उधळपट्टी; राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन
पुणे : पुणे महानगर पालिकेने तब्बल 30 लक्ष रुपये खर्च करून कॉफी टेबल बुक छापण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ
आंदोलन केले. ह्या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराअध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.
या आंदोलनाच्या वेळी पुणे महानगर पालिकेने तब्बल 30 लक्ष रुपये खर्च करून कॉफी टेबल बुक छापण्याचा निर्णय घेतला घेतला आहे. ही नागरिकांच्या पैश्यांची उधळपट्टी आहे अशी टीका करीत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या वतीने या निर्णयाचा निषेध करण्यात आला.
या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पुणे शहराअध्यक्ष मूणाल वाणी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी युवक शहर अध्यक्ष सीमा सातपुते, गणेश मोहिते, पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक व पुणे शहरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशांत जगताप म्हणाले, पुणे महानगर पालिकेने तब्बल 30 लाख रुपये खर्च करून कॉफी टेबल बुक छापण्याचा निर्णय घेतला आहे. महानगर पालिकेतील सत्ताधारी पक्ष हा रस्त्यांवरील खड्डे अजून बुजवत नाही अन् लाखो रुपये खर्च करून कॉफी टेबल बुक छापण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला सत्ताधाऱ्यांना एकच प्रश्न विचारचा आहे. तुम्हाला कॉफीटेबल उभारायला पैसे आहेत. पण पुणेकरांना मूलभूत सुविधा द्यायला पैसे नाहीत. सत्ताधाऱ्याकडे 30 लाख रुपये एवढे आले कुठून. ही जनतेच्या पैश्यांची उधळपट्टी आहे. सत्ताधाऱ्यांनी कॉफी टेबल बुक छापण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी आम्ही मागणी या आंदोलनातून करत आहोत, असे प्रशांत जगताप म्हणाले.
