Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुण्यात आज दिवसभरात 3 हजार 374 नवीन कोरोना रुग्ण

पुणे : पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 3 हजार 374 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8200 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 6 लाख 28 हजार 58 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 58 लाख 24 हजार 97 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील तर 7 पुणे महापालिका हद्दी बाहेरील 3 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9221 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या 36340 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 358 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 10980 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply