Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

 प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पुण्यातील विद्यार्थिनी सादर करणार शास्त्रीय नृत्य

भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या ९ विद्यार्थिनींची निवड : कथक आणि भरतनाट्यम नृत्य सादरीकरण

पुणे: भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या ९ विद्यार्थिनींची २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये भरतनाट्यम आणि कथक नृत्य शैलीचे सादरीकरण या विद्यार्थिनी करणार आहेत.

देश ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. यंदा भारत सरकारने सर्व शास्त्रीय नृत्य कलांचा २६ जानेवारीच्या परेडमध्ये आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये समावेश केला आहे. ईशा ओझा, रेवा जोशी, निशिगंधा केतकर, मधुरा पासलकर, ईशानी सेनजित, शांभवी शेटे, साक्षी कपिल, अनाईता मेहता, निधीशा सालियन या विद्यार्थिनींचा यामध्ये समावेश आहे. विद्यार्थिनींचे स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक शारंगधर साठे यांनी अभिनंदन केले.

शारंगधर साठे म्हणाले, सर्वोत्तम नृत्य कलाकार निवडीसाठी देशभरात विभागीय आणि राष्ट्रीय नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामधून पुण्याच्या भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थिनींची निवड करण्यात आली.

या विद्यार्थिनी समवेत भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या गुरु तेजस्विनी साठे यांना कथक नृत्य दिग्दर्शनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading