Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीचे आंदोलन

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी बाबा यांनी परवा केलेल्या आपल्या भाषणामध्ये ‘बेटी पढ़ाओ, बेटी पटाओ’, असे घाणेरडे वक्तव्य केले आहे. त्या वक्तव्याचा निषेधार्थ आज पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीने  आंदोलन केले. हे आंदोलन पुण्यात बालगंधर्व झाशीची राणी पुतळाबाई येथे करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाला पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, आमदार दिप्ती चौधरी, पूजा आनंद पुणे शहर काँग्रेस महिला शहराध्यक्षा, सुजाता शेट्टी, शोभना परळीकर, नंदाताई डावरे, ज्योती परदेशी, स्वाती शिंदे, अंजली सोलापुरे, नीता टाळु, ताई कसबे, मंगला चव्हाण, शोभा पाडेकर, बेबीताई राऊत, माया डोरे, सुनिता मेमुर, रमा भोसले, वंदना सातपुते, अंजलीपंखा वाला, अंजली सोलापुरे, रेश्मा राणे व पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संगीता तिवारी म्हणाल्या,पंतप्रधान नरेंद्र मोदी बाबा यांनी परवा केलेल्या आपल्या भाषणामध्ये ‘बेटी पढ़ाओ, बेटी पटाओ’, असे घाणेरडे वक्तव्य केले आहे. त्यामुळे मुलींची सुरक्षा हे सरकार ठेवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. देशातील मुली या उच्च पदावर नोकरी करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेध आम्ही याद्या आंदोलनातून करत आहोत, असे संगीता तिवारी म्हणाल्या.

रमेश बागवे म्हणाले, आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फक्त मोदींबद्दल काही बोलले तर त्यांच्या भाजप पक्षाने आंदोलन केले. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी बेटी पढ़ाओ , बेटी पटाओ असे घाणेरडे वक्तव्य करतात ते चालते का. या घाणेरड्या वक्तव्याचा निषेधार्थ आज आम्ही आंदोलन करत आहोत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading