Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

तारा मोबाईल क्रेशेस आणि महान संस्थेला यंदाचा डॉ.अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार जाहीर

पुणे : मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संस्थापक डॉ.अनिता अवचट यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रतिवर्षी देण्यात येणारे डॉ.अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार यावेळी महान ट्रस्ट, मेळघाट आणि तारा मोबाईल क्रेशेस, पुणे या संस्थांना देण्यात येणार आहे. प्रतिवर्षी वैयक्तिक किंवा संस्थात्मक पातळीवर हा पुरस्कार दिला जातो.

हा कार्यक्रम रविवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी 11 वाजता एस.एम.जोशी सभागृह, नवी पेठ येथे संपन्न होणार आहे.प्रत्येकी वीस हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आह,. अशी माहिती मुक्तांगणच्या संचालक डॉ.मुक्ता पुणतांबेकर यांनी कळवली आहे.

पुणे शहरात झपाट्याने वाढत चाललेल्या इमारत बांधकामांवर काम करणा-या मजुरांच्या मुलांना भविष्यात चांगले जीवन जगता यावे या करिता त्यांच्या आरोग्य, पोषण, शिक्षण, विकास आणि कल्याण या बाबिंकडे लक्ष वेधून गेल्या तीन दशकांहून अधिक काळ तारा मोबाईल क्रेशेस ही संस्था
कार्यरत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना यंदाचा डॉ.अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे.

तसेच मेळघाटातील दुर्गम भागातील ग्रामीण आणि आदिवासी समाजातील बालमृत्यू आणि कुपोषणअश्या दोन्ही समस्यांची दखल घेऊन महान ही संस्था कार्यरत असून आजवर एक लाखाच्यावर रुग्णांना आणि पन्नास हजाराहून अधिक कुपोषित ग्रामीण आणि आणि आदिवासी मुलांना संस्थेच्या कार्याच्या माध्यमातून जीवदान मिळाले आहे.मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा पुरवण्यासाठी डॉ.कविता आणि डॉ.आशिष सातव यांनी स्थापन केलेल्या महान संस्थेला
त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना यंदाचा डॉ.अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे.

मुक्तांगणचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी पुरस्कारार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading