मी खूप छोटा माणूस ते खूप मोठे आहेत अजित पवार यांची चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका
पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे रोज पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांना आम्हाला भेटायला वेळ नाही असे म्हणत आहे. त्यावर मी पहाटे पाच वाजता उठतो काम करतो .प्रत्येक आठवड्यात आमदारांना भेटत असतो. मी खूप छोटा माणूस आहे ते खूप मोठे आहेत. असे बोलून अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यातील पत्रकार परिषदेत टीका केली .
कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, महानगरपालिका च्या निवडणुका जशा जवळ जवळ येऊ लागला तरी ओबीसी आरक्षणाचा अजून प्रश्न काही सुटला नाही. त्यात ओबीसी आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाने अजून एक अहवाल फेटाळला असून. याबाबत राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी बैठक घेणार असून. त्याबाबतचा निर्णय देखील मुख्यमंत्री घेणार असल्याचं त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार अमोल कोल्हे हे सध्या ‘Why I Killed Gandhi’ या चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या चित्रपटात अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली आहे. यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांसह अनेकांनी कोल्हे यांचा निषेध केला आहे. त्यावर पवार म्हणाले,2017 ला त्यांचा करार झाला होता, ते त्यावेळी कुठल्या पक्षात नव्हते. त्यावेळी मी एक कलावंत होतो.कलाकार म्हणून त्यांनी काम केलं आहे.जितेंद्र आव्हाड काय म्हणालेत ते त्यांना विचारा असे पवार म्हणाले.
आज सकाळी मुंबईतल्या माहिम भागात एका बिल्डिंगला आग लागली. त्यात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यावर पवार म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः लक्ष घालत आहेत . साधनांना हॉस्पिटल मध्ये घेण्यात नकार दिला आहे अशा काही बातम्या येत आहेत .त्यावर पवार म्हणाले, अशा परिस्थितीत कुठल्याही हॉस्पिटलला नकार देता येणार नाहीमी आता सचिवांशी बोललोय, सरकार तसं होऊ देणार नाही.
आत्ताच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला एक हाती सत्ता मिळाली. भाजप ला एक हाती सत्ता मिळाली नाही. त्यावर अजित पवार म्हणाले, नगरपंचायत निवडणुकीमध्ये सगळे पक्ष स्वतंत्र लढले आहेत. असे अजित पवार म्हणाले.
