उद्या पासून पुढील तीन दिवस मुंबई पुण्यासह राज्यात अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता

पुणे : ऐन हिवाळ्यात गेल्या काही काळापासून महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी  लावली आहे. दरम्यान काही ठिकाणी झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. असं असताना राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग घोंघावत आहेत. उद्या पासून पुढील तीन दिवस मुंबई पुण्यासह राज्यात अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढताना दिसत आहे. हवामान खात्याने उद्या पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे  नोंद केली आहे.

उद्या सकाळापासूनच याठिकाणी ढगाळ हवामान आहे. पुढील दोन तीन दिवस या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर उद्या राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आधीच पावसाळ्यात अतिवृष्टीने येथील शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. अशात पुन्हा एकदा येथे अवकाळी पावसाची शक्यता आहे. उद्या मुंबईसह, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, औरंगाबाद, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या अकरा जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
रविवारी (दि. 23) राज्यात पावसाचा जोर कमी होणार असून यादिवशी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांतच पावसाची शक्यता आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: