कलाकृती मार्गे कलाकार हा जनमानस घडवत असतो म्हणून याकडे सावधपणे बघायला हवे : आप राज्य अध्यक्ष रंगा राचुरे

पुणे : कलाकारांना भूमिका साकारल्यावर त्याचा राजकीय फायदा कसा, होतो हे भान अमोल कोल्हे यांना निश्चित आहे. एखाद्या कलाकृती मार्गे कलाकार जनमानस घडवत असतो म्हणून याकडे सावधपणे बघायला हवे, अशी प्रतिक्रिया आप चे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांनी दिली आहे.

रंगा राचुरे म्हणाले, ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा चित्रपट ३० जानेवारी २०२२ ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. २०१७ साली या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. ‘ज्यावेळी कोणत्याही सक्रिय राजकारणात नसताना मी ही भूमिका साकारली होती. एखादी भूमिका करतो म्हणजे त्या विचारधारे सोबत सहमत असतो असे कलाकार म्हणून कधीच नसते’ असे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हंटले आहे. खरेतर अमोल कोल्हे २०१४ मध्य शिवसेनेत उपनेते म्हणून सामील झाले होते तेव्हा त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करण्यामुळे ओळख मिळाली होती. त्यामुळे २०१७ मध्ये ते कोणत्याही विचारधारेशी सलग्न नव्हते, असे म्हणणे योग्य नाही. नंतर २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा जीवनपट आणि त्यांचं कर्तृत्व घराघऱात पोहोचवण्यामुळे अमोल कोल्हे यांचे नावही लोकांना माहित झले होते. त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला आणि त्यांना झाला.

त्यामुळे  ‘व्हाय आय किल्ड गांधी’या नावातून गौरवीकरणाचा हेतू उघड होतो आहे. निवडणुकीच्या आजूबाजूला या पद्धतीचा विषय राजकीय पटलावर आणण्यामागे काही विशिष्ठ हेतू आहेत का? अशी शंका घ्यायला वाव आहे. त्यामुळे ‘निव्वळ कलावंत’ म्हणून या कडे पाहण्याच्या शरद पवार यांच्या भूमिकेबाबत आम्हाला शंका आहेत, असेही रंगा राचुरे म्हणाले आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: