Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

२०२२ मध्ये बांधकाम क्षेत्रातील किमती १० ते ३० टक्क्यांनी वाढतील

क्रेडाई पुणे मेट्रोचा अंदाज

पुणे : क्रेडाई राष्ट्रीयच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या ‘वार्षिक स्थावर मालमत्ता विकसक अभिप्राय सर्वेक्षण २०२२’ नुसार बांधकाम व्यवसायाशी संबंधित वस्तूंच्या किंमतीत वाढ होत असताना बांधकाम व्यवसाय क्षेत्र आणि घरांच्या किंमतीत १० ते ३० टक्के इतकी वाढ होईल असा अंदाज क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. याबरोबरच नजीकच्या काळात या किंमती वाढत्याच राहतील, असे मत ९० टक्के बांधकाम विकसकांनी व्यक्त केले आहे.
दिल्ली, अहमदाबाद, बेंगळुरू चेन्नई, हैदराबाद,कलकत्ता, मुंबई विभाग आणि पुणे या भारतातील एकूण ८  टियर-१ शहरांसह २१ राज्यांमधील विकसकांनी या सर्व्हेक्षणामध्ये सहभाग घेतला. यामध्ये १०० हून अधिक विकसक सदस्य हे पुण्यातील होते.
यावेळी बोलताना क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष अनिल फरांदे म्हणाले की टाळेबंदीच्या काळात पुण्यातील बांधकाम विकासकांनी सहकार्य आणि सहयोगाची भूमिका घेतली.आता कुठे हळूहळू सर्व गोष्टी पूर्वपदावर येत असताना स्टील, सिमेंट आणि इतर आवश्यक साहित्याच्या वाढत्या किमतींमुळे बांधकाम खर्चात प्रचंड वाढ झाली आहे.या पुढे झालेली आणखी वाढ बांधकाम विकसकांना परवडणारी नाही. या वाढीमुळे जवळपास १० ते ३० टक्के किमतीत वाढ होणार असून, त्यामुळे विकासकांबरोबरच घर खरेदी करणार्‍यांवरही मोठा ताण पडणार आहे. प्रकल्पांसाठी जलद मंजुरी, जीएसटी वर क्रेडिट इनपुट सादर करणे आणि निधीची उपलब्धता वाढवणे याशिवाय वाढत्या इनपुट खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही सरकारकडून अतिरिक्त मदतीची अपेक्षा करत आहोत.”
या सर्व्हेक्षणानुसार पुण्यात सुमारे ९९ टक्के सदस्य विकसक हे २०२२  मध्ये नवीन प्रकल्प सादर करण्याची योजना आखत आहेत तर ३८ टक्के हे याबाबतीत सकारात्मक आहेत. ७२ टक्के सदस्य हे ऑनलाईन विक्रीवर लक्ष केंद्रित करत आहेत आणि ६५ टक्के विकसक हे निवासी प्रकल्पांची योजना आखत आहेत. एकून ७२ टक्के सदस्य रिअल इस्टेटमधील नवीन व्यवसाय मॉडेल्स शोधण्याच्या तयार असल्याचेही या सर्व्हेक्षणामधून समोर आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading