पुना कॉलेजमध्ये जिल्हास्तरीय युवा सप्ताह साजरा
पुणे : मयुरेश जाधव, अरमान शेख ,स्वप्निल गरड, अशद शेख, इम्रान पठाण या युवकांचा उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. जिल्हास्तरीय युवा महोत्सवात आयोजित विशेेष कार्यक्रमात युवकांना सन्मानित करण्यात आले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व पूना कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा सप्ताहाचे पुना कॉलेज कॅम्प येथे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल ,सहाय्यक क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार, राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ताहेर आसी, पुना कॉलेजचे प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख, उपप्राचार्य इक्बाल शेख, उपप्राचार्य मोहिनुद्दीन फलाई,उपप्राचार्य इम्तियाज आगा, उपप्राचार्य लूबना खान, डॉ. बाबा शेख, एनसीसी, प्रमुख डॉ. शाकीर शेख, क्रीडा संचालक डॉ अयाज शेख, क्रीडा शिक्षक अशद शेख, इम्रान पठाण यावेळी उपस्थित होते.
जिल्हास्तरीय युवा सप्ताहात राष्ट्रीय पुरुषांचे तत्वज्ञान व शिकवण यावर व्याख्यान भाषणे ,निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा इत्यादी विविध उपक्रम आणि स्पर्धा राबविण्यात आल्या.
राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते डॉ .आफताब अन्वर शेख, शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ.दिनेश कुमार पांडे , डॉ. मेदिनी अंजनीकर, मुंबई आशा शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे जिल्ह्यातील युवकांसाठी ऑनलाईन पद्धतीने व्याख्यान ठेवण्यात आले. स्पर्धेत विजयी स्पर्धकांना समारोप प्रसंगी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यात, समीर रंगरेज, परवेज शेख, इमरान बेग, फारुख शेख, वसुधा व्हावळ, सबा हुसेन यांनी परिश्रम घेतले.
