कलर्स मराठी ने नालायकपणा बंद करावा अन्यथा गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे – चंद्रशेखर घाडगे

पुणे:अक्कलकोट संस्थान गादीची स्थापना पहिले श्रीमंत फत्तेसिंह राजे भोसले यांनी केली होती. अक्कलकोट संस्थानने 373 वर्षांपूर्वी हा राजवाडा बांधला होता. आज हा ‘जुना राजवाडा ‘ या नावाने परिचीत आहे. छत्रपती शाहू महाराज (संभाजी राजे यांचे पूत्र) यांनी अक्कलकोट संस्थानची 1707 साली निर्मिती केली होती. त्यांचे वंशज महाराज मालोजीराजे भोसले हे स्वामी समर्थांना भेटायला आल्यानंतर नजरांना भेट देताना स्वामींना राग आला… आणि त्यांनी राजांना कशा पद्धतीने वागणूक दिली…? हे असं वादग्रस्त आणि संतापजनक दाखवण्याचे कारण काय…? किती हा आकस… एका भेटायला आलेल्या व्यक्तीबद्दल किती चीड स्वामींना राग आला म्हणून चक्क राजांना मारतात.हे सगळ्यांनी सहन करायचं का. कलर्स मराठी ने हा नालायकपणा बंद करावा…! अन्यथा गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे हे लक्षात ठेवा. असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी दिला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: