Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

कायदा आणि संगीतावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

पुणे: मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे आणि ललित कला केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कायदा आणि संगीत या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र दिनांक १७ व १८ जानेवरी २०२२ रोजी ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर उपस्थित होत्या. शास्त्रीय संगीत विषयक त्यांचा या क्षेत्रातील अनुभव त्यांनी सर्व सहभागींना सांगितला. त्यानंतर डॉ. चैतन्य कुंटे यांनी भारतीय शास्त्रीय संगीताची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि राजेंद्र वैशंपायन यांनी कायदा व संगीताच्या संबंधावर मार्गदर्शन केले. डॉ. अडम डुबिन, स्पेन यांनी संगीत आणि नागरी हक्क यांच्या संबंधाविषयी सखोल मार्गदर्शन केले. चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी संध्या सुरेंद्रन यांनी संगीतविषयक कायद्यातील तरतूदी व त्याची अंमलबजावणी यावर अनेक उदाहरणे देऊन सखोल मार्गदर्शन केले.

पद्मश्री शुभा मुदगल, विख्यात तबलावादक डॉ. अनिश प्रधान, संध्या सुरेंद्रन यांच्या सहभागातून कलाकारांचे हक्क, संगीतविषयक कायदे इ. बद्दल सखोल चर्चा झाली. या दोन दिवसीय चर्चासत्राचे समन्वयक प्रतीक सलगर व डॉ. चैतन्य कुंटे हे होते. या राष्ट्रीय कार्यक्रमास झूम च्या माध्यमातून देशभरातील कायदा व संगीत विषयातील मान्यवर, विद्यार्थी-संशोधकांनी हजेरी लावली. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. क्रांती देशमुख, ललित कला केंद्राचे विभागप्रमुख डॉ. प्रवीण भोळे हे उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading