नाना आपण पुण्यात या आम्ही तुमचे वेगळ्या पद्धतीने स्वागत करू -नगसेवक धीरज घाटे

पुणे: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचा निषेध काल  पासून राज्यभरात भाजपने केला आहे.याचा निषेध पुण्यात आपल्या भारतीय जनता पार्टीने केला आहे. पुण्यातील भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांनी नाना आपण पुण्यात या आम्ही तुमचे वेगळ्या पद्धतीने स्वागत करू .असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना  दिला आहे.

धीरज घाटे म्हणाले, या काँग्रेस पक्षाला देशातून भाजपने हाकले आहे.नाना पटोले यांनी केलेल्या वक्त्याचा आम्ही निषेध करतो असे धीरज घाटे म्हणाले. काँग्रेसच्या पक्षाच्या नेत्याकडून मोदी बद्दल सारखे आक्षेपार्ह विधान केले जातात याचा आम्ही निषेध आख्या राज्यभरात करणार आहोत. पंतप्रधान बद्दल बोलणे हे काँग्रेसच्या नेत्यांना वा अन्य कुठल्याही नेत्यांना शोभत नाही. असे धीरज घाटे म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: