Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

विविध मागण्यांसाठी धायरीकरांचा जन आक्रोश मोर्चा

पुणे: पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने 33 गावे समाविष्ट झाली. पण अजून त्या गावात म्हणाव्या तशा सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. याचा निषेध करण्यासाठी आज धायरीकरानी जन आक्रोश मोर्चा काढला.
हा जन आक्रोश मोर्चा धायरी फाटा ते सिंहगड क्षेत्रीय कार्यालय काढण्यात आला.
ह्या जन आक्रोश मोर्चाचे नेतृत्व धायरी भागातील नगरसेवक राहुल पोकळे यांनी केले.
ह्या जन आक्रोश मोर्चा ला मोठ्या संख्येने धायरी कर उपस्थित होते.
धायरी करांच्या विविध मागण्या

1) नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा टॅक्स 20 % ने कमी व्हावा, टॅक्स साठी सुलभ हप्त्यांची सोय असावी.
२)मुंबई ठाणेच्या धर्तीवर पुण्यात देखील ५०० sq ft च्या सदनिकाना कर माफ करण्यात यावा.
3) अभय योजनेचा कालावधी 31 मार्चपर्यंत वाढवावा व सरसकट सर्व व्याज माफ करावे.
4) शेती व शेती ना विकाससह सरसकट गुंठेवारी करण्यात यावी व प्रोसेस सोपी व स्वस्त असावी.
5)गावे जर पुणे मनपात असतील तर गुंठेवारी प्रक्रिया पीएमआरडी कडे का?ते मनपाकडे वर्ग करण्यात यावे व गुंठेवारी झाल्याशिवाय कराची सक्ती करू नये.
6) पिण्याच्या पाण्याची धायरी व इतर गावात तात्काळ सोय करण्यात यावी व तोपर्यंत महापालिकेने मोफत टॅंकर पुरवावेत.
7) प्रत्येक घरातून मोफत कचरा उचलला जावा.
8) सिंहगड रोडला पर्यायी रस्ता काढल्याशिवाय पुलाचे काम सुरू करू नये.
9) नवले ब्रिज जवळ सातत्याने होणाऱ्या अपघातांसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.
10) धायरी व परिसरात अनेक ठिकाणी ड्रेनजची व लाईटची सोय करून त्या ठिकाणी रस्ते करण्यात यावेत.
11)खाजगी फायनान्स कंपन्यांच्या सावकारी पद्धतीच्या वसुलीवर निर्बंध घालावेत.
12) धायरी रोडला पर्यायी असलेला लोकमत ते DSK रोड हा डीपी रोड तयार करण्यात यावा.
13)नव्याने समाविष्ट गावांचे सर्व्हे करून रहिवासी झोन वाढवावेत
14)धायरी रोडवरील धोकादायक दुभाजक तातडीने काढून टाकावेत.
15)नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील शाळा पुणे मनपात समाविष्ट झाल्या असतील तर शिक्षकांना देखील नोकरीत सामावून घ्यावे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading