Corona : पुण्यात पीएमपी प्रवासासाठी युनिव्हर्सल पास बंधनकारक
पुणे : राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता पुण्यात पीएमपी प्रवाश्यांसाठी युनिव्हर्सल पास बंधनकारक करण्याचा निर्णय पीएमपीएल प्रशासनाने घेतला आहे. याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे. त्यामुळे आता पुण्यात पीएमपीने प्रवास करायचा असेल तर प्रवाशांचे संपूर्ण लसीकरण होणे गरजेचे आहे. तसेच कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा युनिव्हर्सल पास दाखवणे बंधनकारक असणार आहे.
राज्यासह मुंबई, पुणे या शहरात कोरोना रुग्णांचा आलेख वाढता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने मॉल, थिएटर आदी ठिकाणी प्रवेशासाठी कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा युनिव्हर्सल पास दाखवणे बंधनकारक केले आहेत. याच धर्तीवर पीएमपीएल (PMPML)ने हा निर्णय घेतल्याचे पीएमपीएल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
