Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

अजित दादांच्या पुणे जिल्हा परिषदेतच कोरोनाचं चांगभलं.. शेकडोंची गर्दी! मुख्याधिकारी आयुष प्रसाद यांच्यावर कारवाई होणार.?

पुणे  ; महाराष्ट्राला कोरोनाचे नियम सांगणारे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्हा परिषदेचे सभागृहात आज सोमवारी दुपारी गर्दी उसळली आणि कोरोना नियमांचा फज्जा उडाला!

पुणे महानगरपालिका व बारामती नगरपंचायतीची हद्दवाढ झाल्यानन्तर समावेशीत गावातील जिल्हा परिषद शिक्षकांना महापालिकेत सामावून न घेता पुणे जिल्ह्यात समायोजित केले जाणार आहे. त्याबाबत आक्षेप असणारे शिक्षक व शिक्षक संघटना क पदाधिकारी यांना मुख्याधिकारी आयुष्य प्रसाद यांनी पत्र काढून चर्चेसाठी बोलाविले होते. पण त्या पत्रात किती लोकांनी उपस्थित राहावे.? हा उल्लेख कोठेच नव्हता! त्यामुळे या समायोजन प्रक्रियेवर आक्षेप असणारे बहुसंख्य शिक्षक व शिक्षिका जिल्हा परिषदेत आल्याने कोरोना नियमांचा बोर्या उडाला.

‘आम्ही तुमच्याच आदेशानुसार आलो आहोत’ हे उपस्थित शिक्षकांचे उत्तर ऐकून मुख्याधिकारी आयुष्य प्रसाद यांनी अर्ध्यातच सभागृह सोडून जाणे पसंद केले.

पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना जे आदेश देणारे आहेत, त्यांच्याच कार्यालयात हा प्रकार घडल्याने व उपस्थित शिक्षकांनी ही ‘आम्हाला इथे कोरोनाचा स्प्रेड होण्यासाठी आपण बोलावले आहे का.? असे म्हणत, ही समायोजन प्रक्रिया आता स्थगित करून, उन्हाळ्यात करावी’ अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading