मार्गदर्शक सूचनांचा भंग करून राजकीय सोयीची प्रभाग रचना तयार केली – माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणूकीची प्रभाग रचना तयार करताना आपण दिलेल्या मार्गदर्शक सूचनेचा पूर्णपणे भंग करून राजकीय सोयीची प्रभाग रचना पूर्ण केलेली आहे, असा आरोप पुणे महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी केला आहे.

उज्ज्वल केसकर म्हणाले, पुण्याचा विचार केला तर पुणे शहराची प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाने दिलेली आहे. त्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे केली तर पुणे शहराच्या पश्चिमेकडून (खडकवासला धरणातून) पूर्वेकडे (मांजरी गावातून पुढे) मुठा नदी वाहते व पुण्याच्या पूर्वेकडून ( महाळुंगे, बालेवाडी, बाणेर, औंध, बोपोडी, कळस, खडकी कॅन्टोन्मेंटला वळसा घालून संगमवाडी पर्यंत) मुळा नदी वाहात येऊन शहराच्या मध्यभागी संगमवाडीत या दोन नद्यांचा संगम होऊन पुढे या दोन्ही नद्या एकत्रित होऊन पूर्वेकडे मांजरी गावातून पुढे जातात. त्यामुळे शहराचे भौगोलिक दृष्ट्या तीन भाग होतात त्याप्रमाणे खालील प्रमाणे तीन भाग होऊन प्रभाग रचना होऊ शकेल. पण सध्या पुणे महानगरपालिकेने सादर केलेली प्रभाग रचना याप्रमाणे झालेली नाही.

केसकर यांनी मांडलेले मुद्दे खालील प्रमाणे – 

१) मुळा आणि मुठा नदीच्या वरती पुणे मनपा नवीन हद्दी सह ५ लाख ६७ हजार ८५७ इतकी लोकसंख्या असून त्यात वडगावशेरी आणि शिरूर विधानसभा मतदार संघाचा काही भाग अंतर्भूत होतो ही प्रभाग रचना उत्तर पूर्व या मार्गदर्शक सूचनेनुसार करावी लागेल, यात २०११ च्या जनगणनेनुसार ९ प्रभाग होतील.
२) मुळा नदी खाली आणि मुठा नदीच्या वरती मनपाच्या नवीन हद्दी सह ९ लाख,१ हजार,३३ (९०१०३३) यात शिवाजीनगर, कोथरूड, मुळशी-भोर आणि खडकवासला विधानसभा मतदार संघाचा काही भाग समाविष्ट होतो, यात एकूण 14 प्रभाग निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे उत्तर पश्चिम असे होऊ शकतात.
३) मुठा नदी खाली नवीन हद्दी सह २० लाख ९१ हजार ३८५ लोकसंख्या असून यात 3४ आणि १ प्रभाग २ सदस्यांचा अशी ३५ प्रभागांची रचना होईल. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे दक्षिण-पूर्व दिशेने ही रचना असेल यात कसबा, कॅन्टोन्मेंट, हडपसर, पुरंदर, पर्वती आणि खडकवासला या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. असे सर्व मिळून ५८ प्रभाग होतील
(५७ प्रभाग ३ सदस्यांचे व १ प्रभाग २ सदस्यांचा असे एकूण १७३ सदस्य)

Leave a Reply

%d bloggers like this: