Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

इंद्रायणी नदीवरील मोठा पुल जड वाहनांसाठी बंद

पुणे : पुणे शहर हद्दीतील आळंदी-मरकळ, तुळापुर-फुलगाव, लोणीकंद- थेऊर- लोणीकाळभोर – वडकी – उंड्री कात्रज मार्गावरील तुळापुर येथील इंद्रायणी नदीवरील मोठा पुल धोकादायक झाला असल्याने जड वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी. अत्यावश्यक सेवेतील वाहनाशिवाय इतर जड वाहनांसाठी आता हा मोठा पूल बंद राहणार आहे. पर्यायी मार्ग म्हणुन शिक्रापूर ते चाकण किंवा विश्रांतवाडी ते आळंदी या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पुणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उप-आयुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.

फोटो – संग्रही

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading