fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

चिंताजनक : पुण्यात आज दिवसभर 5 हजार 571 नवीन कोरोना बाधीत रुग्णांची नोंद 

पुणे : पुणे शहरात मागील आठवड्यापासून कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येचा आलेख वर चालला आहे. शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. मात्र आज तर पुणे शहरात कोरोना परिस्थिती चिंताजनक असून शहरात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येचा स्फोट झाला आहे. आज दिवसभर 5 हजार 571 नवीन कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2335रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 42 हजार 989 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 5 लाख 81 हजार 19इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 3रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील तर 2 पुणे महापालिका हद्दीबाहेरील 1 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9133 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या 25737 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 182 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 19868 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली  आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading