fbpx
Thursday, May 9, 2024
Latest NewsPUNE

महानगरपालिका गर्दीच्या ठिकाणी कोरोना चाचणी केंद्र व विलगीकरण कक्ष तयार करणार

पुणे : राज्यात कोरोनाचा दररोज उद्रेक होताना दिसत आहे. पुण्यात तर एका दिवसात आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकड्यांनी सर्वच रेकॉर्ड मोडले होते. पुण्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या चार हजारांच्यावर पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. या वाढत्या  रुग्णसंख्येला रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने कोरोनाचे निर्बंध कडक केले आहेत. आता शहरातील गर्दीच्या ठिकाणी कोरोना चाचणी केली जाणार असून शहरात विलगीकरण कक्ष तयार केले जाणार आहे. 

महानगरपालिकेचा सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिलेल्या महितीनूसार या रुग्णसंख्येची वाढत पाहता सार्वजनिक ठिकाणी होणार संसर्ग रोखण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत. महानगरपालिकेने सणस मैदान, नायडू रुग्णालय , लायगुडे हॉस्पिटल यांसह शहरातील 12 ठिकाणी स्वब सेंटर चाचणी केंद्र कार्यरत आहेत याबरोबरच येत्या दोन दिवसात महापालिकेच्या पाच विभागानुसार कोविड केअरसेंटर सुरु केली जाणार आहेत.

ज्या नागरिकांना विलगीकरण राहण्याची सोय नाही, अश्या लोकांसाठी या सेंटरचा वापर केला जाणार आहे. जवळपास 250 खाटांचे विलगीकरण कक्ष तयार करण्यात येणार आहे. आठवड्यात रुग्णसंख्या पाच टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर पोहचली आहे. वाढत्या संख्येमुळं सर्वत्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येबरोबरच ओमिक्रॉनची रुग्ण संख्याही वाढत आहे. शहरातील कोरोना रुग्ण संख्येबरोबरच ओमिक्रॉनची रुग्ण संख्याही वाढ आहे. मात्र या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याचे दिसून आले आहे. नागरिकांनी साधा ताप, सर्दी, खोकला यांकडे दुर्लक्ष न करण्याचं आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading