fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

झोपडपटयांपेक्षा सोसायट्यांमध्येच कोरोनाचे लागण होण्याचे प्रमाण जास्त

पुणे : दाट लोकवस्ती, लहान घरे असलेल्या झोपडपट्टीच्या भागात कोरोनाच्या  संक्रमणाचा धोका असला तरी प्रत्यक्षात या भागापेक्षा सोसायट्यांमध्येच कोरोनाचे लागण होण्याचे प्रमाण मोठे असल्याचे महापालिकेच्या  आकडेवारीवरून समोर आले आहे.

औंध-बाणेर-बालेवाडी, कोरेगाव पार्क, हडपसर, कोथरूड या भागातच बहुतांश रुग्ण आहेत. गेल्या पाच दिवसात सर्वाधिक १२९७ रुग्ण औंध, बाणेर भागात आढळले आहेत. तर सर्वात कमी १४० रुग्ण भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील लोहियानगर, कासेवाडी,रविवार पेठ, महात्मा फुले पेठ यासह इतर भागात मोठ्याप्रमाणात कोरोनाचा प्रसार झाला होता. ओमिक्रॉनाच विषाणू वेगात पसरत असल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत देखील याच भागात जास्त प्रसार होईल अशी शक्यता होती त्यामुळे महापालिकेने तयारी सुरू केली होती. पण शहरात जशी रुग्णसंख्या वाढत असली तरी भवानी पेठ, कसबा पेठ,कोंढवा, येरवडा परिसरात साथ नियंत्रणात आहे.

७ जानेवारीला शहरात सर्वाधिक २७५७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी बहुतांश रुग्ण हे औंध, हडपसर, नगर रस्ता, कोथरूड या भागातील सोसायट्यांमधील रहिवासी होते. तर झोपडपट्टीचा बहुतांश भाग असलेल्या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत रुग्णसंख्या ही १००च्या आतच असल्याचे समोर आले आहे. यात प्रामुख्याने जनता वसाहत, भवानी पेठ, ताडीवाला रस्ता, पाटील इस्टेट, लोहियानगर या भागाचा समावेश आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत शहरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली असली तरी ती झोपडपट्टी किंवा वस्ती भागात नियंत्रणात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत देखील याच भागात जास्त प्रसार होईल अशी शक्यता होती त्यामुळे महापालिकेने तयारी सुरू केली होती. पण शहरात जशी रुग्णसंख्या वाढत असली तरी भवानी पेठ, कसबा पेठ,कोंढवा, येरवडा परिसरात साथ नियंत्रणात आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत शहरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली असली तरी ती झोपडपट्टी किंवा वस्ती भागात नियंत्रणात आहे. सोसायट्यांच्या परिसरात मात्र, साथ वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading