Tuesday, September 15, 2026
Latest NewsMAHARASHTRA

‘जनशक्ती’ चा करमाळ्यात जनता दरबार

करमाळा: कुणाच्या रस्त्याचा प्रश्न… कुणाच्या विजेचा प्रश्न… अनेकांच्या रेशन कार्ड च्या अडचणी… कित्येकांचे वेगवेगळे दाखले पेंडिंग मध्ये पडले होते. सुस्तावलेले प्रशासन व बेफिकीर कर्मचाऱ्यांच्या वेळकाढूपणा मुळे सर्वसामान्य लोकांना, गोरगरीब शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत. मात्र आज करमाळा तालुक्यात जनशक्ती संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या जनता दरबारात अनेकांची पेंडिंग कामे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांच्या एका फोन मध्ये मार्गी लागली. त्यामुळे कित्येकांच्या चेहऱ्यावर आनंद पहावयास मिळत होता.

 आज शुक्रवार दि. करमाळा तहसील आवारात जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी जनता दरबार आयोजित केला होता. यामध्ये गेल्या कित्येक दिवसापासून खराब झालेल्या कोर्टि – आवाटी या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला असून लवकरच या रस्त्याची दुरुस्ती करणार असल्याचे आश्वासन बांधकाम विभागाने दिले. पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या ऊसतोडणी चा प्रश्न. सावडी, कोर्टि, कुंभरगाव या गावातील शेतकऱ्यांच्या ॲडिशनल रोहित्र, सावडी गावातील मुस्लिम समाजाचे कब्रस्तान, उंदरगाव -पोफळज जे काम चालू आहे त्या रस्त्यावरील पुलाच्या  कामामुळे काही शेतकऱ्यांना अडचण निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जात आहे. त्यामुळे तेथील शेती पिकं उध्वस्त होत आहे त्यामुळं तो पूल उंदरगाव येथे न बांधता पुढे बांधावा अशी मागणी बांधकाम विभागाला केली. शिवाय दवाखान्याची लागणारी आवश्यक कागदपत्रे, अनेकांच्या रेशन कार्ड च्या अडचणी, वेगवेगळ्या दाखल्यांच्या तक्रारी, अनेकांच्या आधार कार्डवर होणाऱ्या चुका अशा अनेक अडचणींवर अतुल खुपसे यांनी मार्ग काढला त्यामुळे समस्या व अडचणी घेऊन आलेल्या करमाळा तालुक्यातील प्रत्येक नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

यावेळी रोहन नाईकनवरे, शरद एकाड़, अजीज सय्यद, भारत ननवरे, अतुल भोसले पुणे, देवीदास नेमाने, आबासाहेब नेमाने, पांडुरंग ननवरे, हमीद इनामदार,

मनोहर् नेमाने, जब्बार शेख, निखिल सरडे, बालाजी तरंगे, मारुती खटके, अनिकेत जाधव, जोतिराम तरंगे, बालम शेलार, दिलीप देशमुख, नितीन तळेकर, देविदास तळेकर, हनुमंत तळेकर, गणेश टकले, शकील शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading