Tuesday, September 15, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्य सरकार कडून कठोर निर्बंध जारी; जाणून घ्या नवीन नियमावली

मुंबई : कोरोनाचा राज्यात कहर सुरू आहे. लवकरात लवकर उपाय योजना नाही केल्या तर लॉकडाऊन करण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवू शकते. या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने कठोर निर्बंध जारी केले आहेत. तसेच हे निर्बंध न पळल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा देखील उगारला जाणार आहे. राज्य सरकारने आज नवीन नियमावली जारी केली असून 10 जानेवारीपासून या नियमावलीची अंमलबजावणी सुरू होणार आहे. यामध्ये मुख्यत्वे रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत नाईट कर्फ्यू तर दिवसा जमाव बंदी लागू असणार आहे. पण मुंबई लोकलवर कोणतेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत.

अशी आहे नियमावली

  • राज्यात दिवसा जमावबंदी
  • रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत रात्रीची संचारबंदी
  • लग्न समारंभासाठी 50 जणांना परवानगी
  • अंत्यविधीसाठी 20 जणांना परवानगी
  • हॉटेल, खानावळी 50 टक्के क्षमतेने सुरू
  • हॉटेल, खानावळीला रात्री 10 पर्यंतच परवानगी
  • मैदानं, उद्यानं, पर्यटन स्थळ बंद
  • शाळा, कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
  •  थिएटर 50 टक्के क्षमतेनं सुरु
  • सलून 50 टक्के क्षमतेनं सुरु
  • पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच सार्वजनिक बसने वाहतूकीस मुभा
  •  स्विमिंग पूल, स्पा, व्यायामशाळा पूर्णपणे बंद
  • खासगी कार्यालयात 50 टक्के उपस्थितीची मर्यादा
  • कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाच सरकारी कार्यालयात प्रवेश
  • लेखी आणि स्पष्ट परवानगीशिवाय सरकारी कार्यालयात लोकांना प्रवेश नाही
  • व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध करुन नागरिकांशी संवाद साधावा
  • एकाच कॅम्पसमधील किंवा बाहेरुन आलेल्यांसाठी व्हिडीओ कॉन्फरिन्सिंगद्वारे संवाद
  • कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करुन द्यावी
  • कार्यालयाच्या सोयीनुसार कामाच्या तासात बदल करणे
  • सरकारी कार्यालयांमध्ये कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक
  • थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर वापर बंधनकारक

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading