Sunday, November 1, 2026
Latest NewsPUNE

पुणे शहरातील सर्व क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत तक्रार निवारण कक्ष असणे आवश्यक – रुपाली चाकणकर

पुणे : पुणे शहरातील सर्व क्षेत्रिय कार्यालयात अंतर्गत तक्रार निवारण कक्ष असणे आवश्यक असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले. तसेच कोरोना काळात बंद झालेल्या तेजस्विनी बसेस पुन्हा सुरू व्हाव्यात आणि तेजस्विनी बसेस मधून कोणत्या पुरुषाने प्रवास केला तर त्याच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, असे आदेश देखील त्यांनी पुणे महापालिकेला दिले.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे महानगरपालिकेला भेट देत पालिकेतील अंतर्गत तक्रार निवारण कक्ष, तेजस्विनी बस इत्यादी संबंधात आढावा घेतला. यावेळी पुणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते दिपाली धुमाळ ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्ष मृणालवाणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी चाकणकर यांच्याशी संवाद साधला.

यावेळी चाकणकर यांनी विविध कामांचा आढवा घेतल्याचे सांगितले. तसेच पालिकेतील महिला कर्मचाऱ्यां समवेत स्वतंत्रपणे चर्चा करून त्यांच्या भावना व समस्या जाणून घेतल्या.

 

Leave a Reply