Tuesday, September 15, 2026
Latest NewsPUNE

संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांना ‘स्वरसम्राज्ञी आशा भोसले पुरस्कार’ जाहिर 

पद्मश्री डॉ. गिरीष प्रभुणे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रविंद्र यांचा नागरी सत्कार

पिंपरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने दिला जाणारा ‘आशा भोसले पुरस्कार’ यंदा संगीतकार, दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांना जाहिर झाला आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या निवड समितीचे प्रमुख  जेष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर आहेत. यावेळी नाट्यपरिषदेचे कार्यकारिणी सदस्य किरण येवलेकर, नरेंद्र आमले, सुदाम परब, राहुल भोईर, संतोष शिंदे, गौरी लोंढे, रुपाली पाथरे आदी उपस्थित होते.

यावेळी भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले की,  गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २००२ पासून ‘स्वरसम्राज्ञी आशा भोसले पुरस्कार’ दिला जातो. गेल्यावर्षी कोरोनामुळे पुरस्कार वितरण सोहळा झाला नाही. २०२० चा पुरस्कार कोरोनाचे नियम पाळून लवकरच घेण्याचे नियोजन आहे. एकोणीसावा पुरस्कार डॉ. सलील कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे. या वर्षीचा हा १९ वा पुरस्कार असून पुरस्काराचे स्वरुप १ लाख ११ हजार रुपये रोख, शाल व सन्मान चिन्ह असे आहे. या कार्यक्रमात डॉ. गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रविंद्र यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे अशीही माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी दिली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान आयोजित २३ वी ‘ कै. राम गणेश गडकरी करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा ‘ यंदा ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading