Saturday, October 31, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. रात्री उशिरा रोहित पवार यांनी आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्विट करून कळवले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रोहित पवार यांचे काका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांना मास्क न घातल्यावरून जाहीर कार्यक्रमात बोलले होते.

रोहीत पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो, पण अखेर त्याने मला गाठलंच. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण आपला आशीर्वाद असल्याने काळजीचं काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत!”

Leave a Reply