Saturday, October 31, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकाराची नियमावली जाहीर

मुंबई : वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कठोर निर्बंध जारी केले जात आहेत. नाईट कर्फ्यू आणि जमावबंदी नंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकाराची नियमावली जाहीर केली आहे. पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्के इतकी असावी. तर उर्वरीत कर्मचाऱ्यांना work from home देण्यात यावे, असे नियमालीत केंद्र सरकारने म्हटले आहे. सरकारी अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी वेळापत्रक ठरवण्याच्या सूचना केंद्राकडून सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत.

अशी आहे नियमावली – 

– सरकारी कार्यालयात एकूण कर्मचाऱ्यांच्या 50 टक्के उपस्थिती असावी

–  उर्वरीत कर्मचाऱ्यांना work from home देण्यात यावे

– कंटेमेंट झोनमध्ये राहत असलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यलयात बोलवू नये

– दिव्यांग, अपंग कर्मचाऱ्यांनाही कार्यलयात बोलवू नये

– गर्भवती महिलांनाही सूट देण्यात आली आहे.

 

Leave a Reply